UPSC-SIAC, IAS TRAINING CENTER (KOLHAPUR, AURANGABAD Etc.) : सामायिक प्रवेश परीक्षा (CET)
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२५ करीता पूर्व प्रशिक्षणासाठी महाराष्ट्र राज्यातील राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था, मुंबई व भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र कोल्हापूर, नागपूर अमरावती, छ. संभाजीनगर, नाशिक या सहा केंद्रातील तसेच शासनाच्या इतर विभागातील YASHADA, ACEC, PCMC, UPSCCETC, CDIAC येथील प्रवेशासाठी सामायिक प्रवेश परीक्षा (CET) दि. ०४.०८.२०२४ रोजी घेण्यात येईल.
- उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा. पदवी परीक्षेचा निकाल प्रलंबित असणारे विद्यार्थी अर्ज करू शकतात. तथापि प्रत्यक्ष प्रवेशावेळी पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे.
वयोमर्यादा: (०१. ०८. २०२५ रोजी)
- खुला प्रवर्ग/ EWS : २१ ते ३२ वर्षे.
- इतर मागासवर्गीय/ विशेष मागासवर्गीय/ भटक्या जमाती/ सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय (SEBC) उमेदवार : २१ ते ३५ वर्षे.
- अनुसूचित जाती/ जमाती उमेदवार : २१ ते ३७ वर्षे.
- दिव्यांग उमेदवार : २१ ते ४५ वर्षे.
परीक्षा शुल्क:- खुला प्रवर्ग : रु. ६०० /-
- मागासवर्गीय/ राखीव प्रवर्ग : रु. ४०० /-
Notification PDF:
अंतिम दिनांक:
घरबसल्या ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधा:
For Detail Advertisement in Marathi Subscribe to Weekly Nokari Sandharbha | Click Here |