PAVITRA PORTAL 2022
पवित्र पोर्टल २०२२ (शिक्षक भरती पोर्टल)
✳ शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 या चाचणी दिलेल्या उमेदवारांना स्व प्रमाणपत्र तयार करण्यासाठी पवित्र पोर्टल द्वारे सुविधा देण्यात आलेली आहे
✳ उमेदवारांना स्व प्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी दिनांक 01 सप्टेंबर 2023 ते दिनांक 15 सप्टेंबर 2023 पर्यंत मुदत देण्यात येत आहे
शैक्षणिक पात्रता :
अ.क्र | वर्गानुसार शिक्षक पदे आणि शैक्षणिक पात्रता |
१ | इयत्ता १ ली ते ५ वी करीता (प्राथमिक शिक्षक): | 1 ते 5 या वर्गा करीता जे शिक्षक म्हणून रुजू होतील ते प्राथमिक शिक्षक या गटात मोडतात. • त्यासाठी आवश्यक असणारी पात्रता HSC, DEd + TET 1/CTET 1 • राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद (NCTE) नुसार केंद्र शासन किंवा महाराष्ट्र शासनाने आयोजित केलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा (Teachers Eligibility Test-TET) उत्तीर्ण असणे अनिवार्य. |
२ | इयत्ता ६ वी ते ८ वी करीता (उच्च प्राथमिक शिक्षक): | वर्ग 6-8 करीता जे शिक्षक म्हणून रुजू होतात ते उच्च प्राथमिक शिक्षक या गटात मोडतात. त्यासाठी आवश्यक असणारी पात्रता 1) HSC, DEd, Graduation + TET2/CTET2 किंवा 2) BEd + TET2/CTET2 राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद (NCTE) नुसार केंद्र शासन किंवा महाराष्ट्र शासनाने आयोजित केलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा (Teachers Eligibility Test-TET) उत्तीर्ण असणे अनिवार्य. |
३ | इयत्ता ९ वी ते १० वी करीता (माध्यमिक शिक्षक): | वर्ग 9 ते 10 करीता जे शिक्षक म्हणून रुजू होतील ते माध्यमिक शिक्षक गटात मोडतात. त्यासाठी आवश्यक असणारी पात्रता BEd + Graduation |
४ | इयत्ता ११ वी ते १२ वी करीता (उच्च माध्यमिक शिक्षक): | वर्ग 11 ते 12 करीता जे शिक्षक म्हणून रुजू होतील ते उच्च माध्यमिक शिक्षक या गटात मोडतात. त्यासाठी आवश्यक असणारी पात्रता BEd + Post Graduation |
खुल्या प्रवर्गासाठी: १८ते ३८ वर्षे
मागास प्रवर्गासाठी: १८ ते ४३ वर्षे
दीव्यांग पात्र उमेदवारासाठी, प्रकल्पग्रस्त/भूकंपग्रस्त उमेदवारासाठी कमाल वयोमर्यादा: ४५ वर्षे
✳ अंतिम दिनांक: 22 सप्टेंबर 2023
पवित्र पोर्टल २०२२ अर्ज घर बसल्या भरण्यासाठी संपर्क साधा