MPSC गट-क सेवा मुख्य परीक्षा - २०२५ जाहिरात प्रसिद्ध!
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) राज्य शासनाच्या विविध विभागांमधील गट-क (Group C) संवर्गातील एकूण १८८४ पदांच्या भरतीसाठी मुख्य परीक्षेची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. संयुक्त पूर्व परीक्षेत पात्र ठरलेले उमेदवार या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात.
📊 पदांचा संक्षिप्त तपशील (Vacancy Details)
| अ.क्र. |
विभागाचे नाव |
पदाचे नाव |
एकूण पदे |
| १ |
उद्योग ऊर्जा व कामगार विभाग |
उद्योग निरीक्षक (Industries Inspector) |
०९ |
| २ |
वित्त विभाग |
कर सहायक (Tax Assistant) |
७३ |
| ३ |
वित्त विभाग |
तांत्रिक सहायक (Technical Assistant) |
०४ |
| ४ |
गृह विभाग |
दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क (Sub-Inspector, Excise) |
१२५ |
| ५ |
शासनाचे विविध विभाग |
लिपिक-टंकलेखक (Clerk-Typist) |
१६७३ |
| |
एकूण पदे |
|
१८८४ |
🎓 पात्रता व अर्हता (Eligibility Criteria)
१. शैक्षणिक पात्रता:
-
उद्योग निरीक्षक संवर्गासाठी: वैधानिक विद्यापीठाची अभियांत्रिकीमधील पदवी (स्थापत्य व संलग्न विषय वगळून) किंवा तंत्रज्ञानामधील किमान पदविका (Diploma), किंवा विज्ञान शाखेतील (Science) पदवी.
-
इतर सर्व संवर्गासाठी (कर सहायक, लिपिक इ.): मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी (Degree) किंवा समतुल्य अर्हता. (टीप: पदवी/पदविका अंतिम वर्षाचे उमेदवार पूर्व परीक्षेसाठी पात्र होते, परंतु मुख्य परीक्षेचा अर्ज भरण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे).
-
मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
२. टंकलेखन अर्हता (Typing Criteria):
-
कर सहायक: मराठी टायपिंग ३० श.प्र.मि. आणि इंग्रजी टायपिंग ४० श.प्र.मि. शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण.
-
लिपिक-टंकलेखक: मराठी टायपिंग ३० श.प्र.मि. किंवा इंग्रजी टायपिंग ४० श.प्र.मि. प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण.
-
(टीप: दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त व अंशकालीन कर्मचारी यांना टंकलेखन अर्हता पूर्ण करण्यासाठी नियुक्तीपासून २ वर्षांची तात्पुरती सूट अनुज्ञेय राहील).
३. शारीरिक पात्रता (केवळ दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क पदासाठी):
-
पुरुष उमेदवार: उंची - किमान १६५ सेंमी (अनवाणी), छाती - ७९ सेंमी (न फुगवता) व फुगवून ५ सेंमी जास्त.
-
महिला उमेदवार: उंची - किमान १५५ सेंमी (अनवाणी), वजन - किमान ५० किग्रॅ.
🔞 वयोमर्यादा (Age Limit)
(वयोमर्यादा गणण्याचा दिनांक: १ फेब्रुवारी, २०२६)
📝 परीक्षा योजना व गुणदान (Exam Pattern)
💵 परीक्षा शुल्क (Application Fee)
🗓️ महत्त्वाच्या तारखा (Important Dates)
-
ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात: २१ मे, २०२६ (दुपारी २:०० वाजल्यापासून)
-
ऑनलाईन अर्ज व परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक: ०४ जून, २०२६ (रात्री २३:५९ वाजेपर्यंत)
-
स्टेट बँकेत चलनाची प्रत घेण्याचा अंतिम दिनांक: ०६ जून, २०२६
-
चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक: ०८ जून, २०२६ (बँकेच्या वेळेत)
-
मुख्य परीक्षा दिनांक: रविवार, १२ जुलै, २०२६
-
परीक्षा केंद्रे: अमरावती, छत्रपती संभाजी नगर, नागपूर, नाशिक, नवी मुंबई व पुणे.
ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी संपर्क: